दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ठोकल्याने एक वर्षाच्या मुलासह पती - पत्नी ठार.
एस.के.24 तास
सांगली : दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव वेगात ठोकल्याने एक वर्षाच्या मुलासह पती पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी - नागपूर महामार्गावर घडली.अपघातग्रस्त कुटुंब धाराशिव जिल्ह्यातीत (ता.कळंब) येथील असून ऊस तोडीचा हंगाम संपल्यानंतर दुचाकीवरुन गावी जात होते. अपघातानंतर मोटारीच्या वाहन चालकांने पोबारा केला आहे.
उसतोडीचे साखर कारखान्याचे काम संपल्यानंतर सुरेश युवराज शिंदे वय,29 वर्ष,त्याची पत्नी संजना वय,28 वर्ष व मुलगा ज्ञानेश्वर वय,1 वर्षे असे तीन जण मोटारसायकल वरून MH.12 KB 8452 जात होते. आज पहाटे 3 : 00 वा.सुमारास भोसे गावच्या पुढे 5 कि.मी. अतंरावर गेले.
असता पाठीमागुन येणाऱ्या एका चारचाकी वाहन MH. 12 UJ 0715 चालकाने मोटार सायकलीस पाठीमागुन भरधाव वेगाने येवुन धडक दिली.यात मोटारसायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले होते.
गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून मोटारीच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मोटार चालक जखमींना कोणतीही मदत न करता अपघाताची माहिती पोलीसांना न कळविता परस्पर निघुन गेला आहे.