श्री.संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/०२/२५ ब्रम्हपुरी येथील संत रविदास चौक येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धाचा समावेश होता.स्पर्धेदरम्यान विविध स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा.संजय मगर सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री लीलाधर जी वाढई उपस्थित होते.कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री चापके सर (नागपूर )हे उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. प्रा. सुभाष जी शेकोकार सर, उपप्राचार्य,ने. ही. महाविद्यालय ,ब्रम्हपुरी होते, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज समाज मंडळ महिला अध्यक्षा मा. सौं. हेमाताई अंडेलकर तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व चर्मकार समाज बांधव, माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमूर्ती ॲड.जयप्रकाश अंडेलकर, डॉ.अंकुर अंडेलकर तसेच राष्ट्रीय जलतरणपटू माननीय शिवराज मालवी सर यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज समाज मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.अंकज कानझोडे यांनी केले.
तर कु. प्रिन्सि शेकोकर,श्री काशिनाथजी अंडेलकर, श्री चापके सर, श्री लीलाधर वाढई सर यांनी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या विषयी लोकांमध्ये असलेले पूर्वग्रह दूर करण्यासाठी मदत केली व लोकांना संतांविषयी अवगत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.संजय मगर सर यांनी आजच्या युगात होत असलेल्या अनास्थेबद्दल जागृत केले व सर्व बांधवांनी एकत्रित येण्यास जागृत केले. कार्यक्रमाप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल जाहीर करून स्पर्धकांना पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. )तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.सचिन मेंढे, ऋषीजी बसेशंकर, जगदीशजी भशाखेत्रे, लक्ष्मणजी भशाखेत्रे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री.अतुल जी कानझोडे यांनी केले व आभार सौ. दर्शना अंडेलकर यांनी मांडले. कार्यक्रमानंतर लगेच श्री सद्गुरू संत रविदास महाराजांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. जयंतीच्या यशस्वीतेकरिता सर्व समाज बांधवांनी यथासंभव प्रयत्न करून जयंती जल्लोषात साजरी केली.