सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर संपन्न.
★ स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा सामाजिक योगदनाबद्दल सत्कार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ ला लॉयन आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लॉयन क्लब चंद्रपूर युगल महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली आयोजित विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर स्थळ राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.दिलीपजी भंडारी उपस्थित होते
मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिरात ५० वर्षा वरील महिला आणि पुरुष एकूण ५३७ रुग्णांनी लाभ घेतला त्यापैकी १७० रुग्णाची निवड झाली, निवड झालेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपण शस्त्रक्रिया सेवाग्राम येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्रतज्ञांच्या हस्ते होणार आहे.
महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली तर्फे दरवर्षी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर आयोजित होतात आणि कित्येक गरीब आणि निराधार लोकांना याचा लाभ होतो त्यामुळे अनेक स्तरातून महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व संचालकांचे कौतुक आणि अभिनंदन केल्या जात आहे,याप्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत व संस्था सदस्य प्रशांत तावाडे यांचा संस्थेमार्फत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे विभागीय संघटक प्रकाश खजांची,मनोज ताटकोंडावार अध्यक्ष महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली,सचिव राहुल मेरुगवार प्रफुल बुटे, संतप्रकाश शुक्ला,जगदीश बनसोड,रोशन मेरुगवार, प्रा.शेखर प्यारमवार, प्रवीण झोडे, अमोल तिगलवार,विनोद बांगरे, राजेश रक्षनवार,जगदीश बनसोड,अजय पोहनकर,प्रा.अरुण राऊत,किशोर संगिडवार,अजय पोटवार,अशोक पोटवार,किरण आकुलवार,रुपचंद लाटेलवार,रवींद्र ताटकोंडावार,यांनी अथक परिश्रम घेतले