भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
भद्रावती : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या रजत महोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याचे दि. 3 जानेवारी रोजी सकाळी11.00 वाजता भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे राहणार आहेत सत्कारमूर्ती म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणराव संजय देवतळे राहणार आहेत तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमानी हे मुख्य अतिथी राहणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून एन.आय.टी.नागपूरचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी अविनाश कातडे वन प्रकल्प विभाग चंद्रपूरचे सह व्यवस्थापक स्वप्निल मरस्कोल्हे तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे
महाप्रातीक तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे भद्रावती नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर वरोरा नगरपरिषद चे माजी नगरध्यक्ष अहेतेश्याम अली मानव अधिकार सहायता संस्थांचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख विनायक गरमडे दैनिक महासागर चे जिल्हा संपादक प्रवीण बदकी प्राध्यापक नाहीद हुसेन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुप कुमार भार्गव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रजत महोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याला राज्यातील विदर्भातील जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्य गण व पत्रकार बंधू यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
याप्रसंगी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना संघटन कौशल्य सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या विदर्भ जिल्हा तालुका पदाधिकारी सदस्य सोबतचे लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.