शिवजयंती उत्सव आनंदात व शांततेत साजरी करावी. - ठाणेदार,प्रमोद रासकर
एस.के.24 तास
सावली : शिवजयंती उत्सवा दरम्यान मंगळवार रोजी ठाणेदाराच्या वतीने शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली यादरम्यान शिवजयंतीच्या सगळ्यात मोठ्या आनंदोत्सवात नागरिकांनी शिवजयंती साजरी करीत असताना शांततेच्या भंग होणार नाही तसेच आपआपल्या गाव पातळीवरील होणाऱ्या कार्यक्रमास गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव पार पाडावा.
व या उत्सवा दरम्यान कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची सुद्धा नागरिकांनी भान ठेवीत उत्सव आनंदात साजरा करावा अशा सूचना करीत याप्रसंगी ठाणेदार प्रमोद रासकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे.
उत्सवाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचणार नाही यांची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे या उत्सादरम्यान आम्ही आपल्या कर्तव्यावर राहूच परंतु आपणही आम्हाला सहकार्य करून शिवजयंतीच्या उत्सव आनंदात साजरा करावा.