सरकारने एकस्तर पदोन्नती द्यावी,अशी मागणी करत पदोन्नती व वनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू.

सरकारने एकस्तर पदोन्नती द्यावी,अशी मागणी करत पदोन्नतीवनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू.


एस.के.24 तास


गडचिरोली : सरकारने एकस्तर पदोन्नती द्यावी,अशी मागणी करत पदोन्नती व वनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेच्या नेतृत्वात सोमवार (ता.१७) पासून वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.




यासंदर्भात आंदोलकांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील अतिशय मागास व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शासन या जिल्ह्याच्या विकासाकरितता कटीबद्ध असुन प्रशासनाच्या माध्यमातुन शासकीय योजना जनसामान्यापर्यंत प्रभाविपणे पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 


या योजना प्रभाविपणे कार्यान्वीत करण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत शासन निर्णय क्रमांक टीआरएफ २०००/प्र.क्र.३/ ०१२ दिनांक ६ ऑगस्ट २००२ नुसार ‘एकस्तर पदोन्नती’ ची सवलत देऊ केली आहे. त्यानुसार या जिल्ह्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांनी धारण केलेल्या पदाच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देऊ केलेली आहे. 

जिल्हा परिषद, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांत एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात येत आहे. परंतु वनविभागातील कर्मचाऱ्यांना मात्र या सवलतीचा योग्यरित्या लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली वनविभागाच्या माध्यमातून वेळोवेळी विभागीय कार्यालय गडचिरोली यांच्याकडे एकस्तर पदोन्नतीच्या वेतनश्रेणीबाबत (वनरक्षक पदाचे वनपाल पदाच्या वेतनश्रेणीबाबत) निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यालयास विनंती केली. 

परंतु विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय वनकर्मचारी हे रानावनात कोणत्याही मनुष्यबळाशिवाय कर्तव्य बजावणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे एकस्तर वेतनश्रेणीबाबतच्या मागणीची कुठल्याही प्रकारची आजतागायत कार्यवाही केलेली नाही. शासन निर्णय २९ फेब्रवारी २०२४ अन्वये दिनांक ६ ऑगस्ट २००२ च्या एकस्तर पदोन्नतीसंदर्भात स्पष्टीकरणात्मक सुचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार संघटनेने विभागीय कार्यालयास योग्यरित्या एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत पाठपुरावा केला असता असंवेदनशील अधिकारी यांनी संघटनेच्या विनंतीला केराची टोपली दाखवली आहे.वनविभागाचे प्रशासकीय अधिकारी हे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काप्रती कमालीची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती असंतोष निर्माण झालेला आहे. 


गडचिरोलीतील इतर विभाग ज्याप्रमाणे एकस्तर पदोन्नतीचा लाभ देत आहे त्याचप्रमाणे आम्हालाही न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात पदोन्नत व वनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेचे अध्यक्ष अनंत ठाकरे, सचिव गुरुनाथ वाढई, कार्याध्यक्ष राजेंद्र कोडापे, उपाध्यक्ष विजय घोळवे, सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, तसेच शेकडो वनकर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !