चर्मकार समाज मंडळ,ब्रम्हपुरी च्या वतीने श्री.संत गुरु रविदास महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्याने विविध स्पर्धां व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपूरी - १४/०२/२५ चर्मकार समाज मंडळ,ब्रम्हपुरी तसेच श्री संत रविदास परिवाराच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जन्मोत्सव कार्यक्रम दिनांक १६/०२/२५ रविवारला संत रविदास चौक येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भाऊ वडेट्टीवार माजी विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य,उद्घाटक प्राध्या. संजय मगर संचालक स्टडी सर्कल अकॅडमी ब्रह्मपुरी, प्रमुख वक्ते सचिन चापके नागपूर, मार्गदर्शक डॉ. शेकोकर ,जगदीश भसाखेत्रे, डॉ.सचिन मेंढे,विशेष अतिथी विलास विखार माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत एन्ड जयप्रकाश अंडेलकर, डॉ. अंकुर अंडेलकर, शिवराज मालवी सेवानिवृत्त शिक्षक, राष्ट्रीय जलतरणपटू यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे.
तरी या जन्मोत्सव सोहळ्याला परिसरातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत रविदास समाज मंडळ अध्यक्ष अंकज कानझोडे व सदस्य तसेच महिला कार्यकारिणी अध्यक्ष हेमा अंडेलकर व सदस्य आणि समस्त चर्मकार समाज बांधव यांनी केले आहे.