अ-हेरनवरगांव येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटात साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - १२/०२/२५ अ-हेरनवरगांव येथे लोहार समाजाच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक सतीश ठेंगरे सचिव विकास एज्युकेशन सोसायटी,अ-हेरनवरगाव यांनी वामनराव मिसार यांचे अध्यक्षतेखाली ईश्वर कुथे,घरत सर,रामु वकेकार सर अमरदीप लोखंडे, बाळु बागडे, राजु वकेकार या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर
उपस्थित सर्व अतिथी यांनी सुद्धा पुष्प अर्पण करून भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.भगवान विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनीत ठेंगरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम वकेकार, रवींद्र वकेकार, बागडे , वकेकार मोटार रिवाइंडिंग, सखाराम सावजकार व संपूर्ण लोहार समाज आबाल - वृद्ध यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या शांततेत पार पाडले.