सावली ते हरांबा रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
★ सावली ते हरांबा रसत्याची दुरुस्ती करण्यात यावी. - उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख सावली (शिंदे गट) यांची मागणी.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील अनेक रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सावली ते हरांबा पर्यंत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. अंदाजपत्रकानुसार काम झालेला नसल्यामुळे रस्ता पूर्णपणे उकडलेला असल्याने रस्त्यावरची गिट्टी पूर्णपणे पसरली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा काम झालेला दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाले असल्याची चर्चा तालुक्यातील जनता करीत आहे. संबंधित बांधकाम विभाग व कंत्रदारांच्या हात मिळूनीमुळे बोगस, निकृष्ट दर्जाचा काम झाल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज अपघाताला आमंत्रण द्यावे लागत आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सावली तालुक्यात रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले परंतु सर्वच रस्ते शेवटची घटका मोजत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांना मणक्याच्या त्रास दम्याच्या त्रास होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी. - उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख (शिंदे गट) यांनी केली आहे.