बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यानी लुटला मनसोक्त आनंद ; मोहोर्ली मो.शाळेत बाल आनंद मेळावा साजरा.
एस.के.24 तास
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोर्ली मो. येथे दिनांक 27 जानेवारी 2025 ला बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटक सुधीर भाऊ शिवणकर सरपंच मोहोर्ली हे होते. अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे केंद्रप्रमुख भेंडाळा, प्रमुख पाहुणे गुणवंत झरकर शाळा समिती अध्यक्ष
दिगांबर चौधरी पोलीस पाटील,रीताताई कुलसंगे शाळा समिती उपाध्यक्ष , उर्मिलाताई मडावी उपसरपंच,व शाळा समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य होते. बाल आनंद मेळाव्यात रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, थ्रो बॉल स्पर्धा, चमचा गोळी स्पर्धा, तीन पायाची शर्यत, हंडी फोड स्पर्धा, व विविध सांघिक खेळ घेण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोद भगत अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी चामोर्शी हे होते.अध्यक्ष सुधीर भाऊ शिवणकर सरपंच, प्रमुख पाहुणे गुणवंत झरकर अध्यक्ष शाळा समिती, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळावा खूप महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन प्रमोद भगत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक मारोती आरेवार यांनी केले. संचालन शिक्षक तुमदेव दहेलकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक क्रिष्णा गौतम व मिलिंद कोवे यांनी सहकार्य केले.