सिंदेवाही येथील रोजगार मेळाव्यात 650 युवकांची नौकरी निवड.
राजेंद्र वाढई - उपसंपादक ! एस.के.24 तास
सिंदेवाही : दिनांक 13/ 2 /2025 ठीक 11.00 रोजी सिंदेवाही येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले होते. ग्रामीण व शहरी भागातला तरुण शिक्षणानंतर नोकऱ्या मिळत नसल्यामुळे हतबल व चिंताग्रस्त थकलेल्या अवस्थेमध्ये जीवन जगत आहे त्या तरुणांना हाताला काम रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांती दल व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता केंद्र चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जागा उपलब्ध असणाऱ्या व कौशल्यनिहाय रोजगार देणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित केले होते .या ठिकाणी दहा कंपन्या उपस्थित झाल्या होत्या व त्यात बाराशे जागा उपलब्ध होत्या यामध्ये 900 तरुणांनी आपले नाव नोंदणी करून कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या कंपनीला आवश्यक असणारे कौशल्य सक्षम 650 तरुणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.राजेश जी डायरे तर उद्घाटक म्हणून मा. श्री.ऋतुराज सूर्या महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर, मा.श्री.राजूभाऊ नंदनवार अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, मा.श्री.विकास रांचलवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.योगेंद्र जयस्वालजी तर
आयोजक म्हणून मा.श्री.भैय्यासाहेब येरमे यांनी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मा.श्री.ऍड. राजेंद्र जी महाडोळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसीएस सीएसटी क्रांती महाराष्ट्र राज्य , प्रांताध्यक्ष सौ रंजनाताई पारशिवे विदर्भ भोई समाज महासंघ ,श्री.राजेंद्र वाढई, श्री.अनिल सोनुले,श्री.नंदू बारस्कर,श्री. ओमदेव मोहरले श्री.नंदू भाऊ नेहारे,श्री. नकटूजी सोनुले , श्री योगेश जी निकोडे, श्री. अंबादास जी चौधरी,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री.गुरु भाऊ शेंडे तर आभार प्रदर्शन श्री.भास्करजी वाढई यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय ओबीसी एससी क्रांती दलाचे आयोजन समिती अनिल महाडोळे ,अतुल मांदडे,सुखदेव भरडकर, पुरुषोत्तम मांदाडे, गुरु भाऊ चौधरी ,शांताराम आदे, विवेक सोनुले ,ओम प्रकाश वाढई, विनोद शेंडे, धीरज नंदनवार, संजय ठाकरे ,योगिता महाडोरे, निळकंठ सोनुले, प्रशांत दानवे
-