गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथे 5 वर्गखोल्यांना पावसाळा सुरू होता तेव्हापासून जीर्ण अवस्थेत.
★ इमारत नसल्याने पटांगणात झाडाच्या खाली विद्यार्थी ज्ञानर्जन आणि शिक्षक वर्ग अध्यापन सुरू ; शासनाचे जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष.
ग्राउंड रिपोर्ट : - सुरेश कन्नमवार मुख्य संपादक !! एस.के.24 तास
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,कोचेवाही केंद्र,बनाथर येथील 5 वर्गखोल्या पावसाळ्यात इमारतीला गळती लागली असून इमारत जीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.दरम्यान इमारतीची दुसरी सोय नसल्याने इमारतीच्या पटांगणात असलेल्या झाडाचा आधार घेत विद्यार्थी ज्ञानर्जन आणि शिक्षकवर्ग अध्यापन करत आहेत.
मात्र कधीही मोठी दुर्घटना होण्याचे शक्यतेने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक इमारतीला टाळे मारून बंद करून ठेवले.आणि विद्यार्थ्यांना पटांगणात झाडाच्या खाली शिक्षणाचे धडे देत आहेत.5 वर्गखोल्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या छतांचे पोपडे पडायला लागले.छतावरचे काँक्रेट पडून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत.
सदर दिनांक,05/02/ 2025 ला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कोचेवाही यांना मुख्याध्यापक राधेश्याम मेंढे यांनी पावसाळ्यापूर्वी निर्णय इमारतीचे दुरुस्त करून देण्यात यावे जेणेकरून इमारती अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नय,अभ्यासक्रम नुकसान होऊ नये,म्हणून लवकरात लवकर जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठपुरावा करून इमारत लवकरात लवकर बनवून देण्यात यावे अशी मुख्याध्यापक यांनी समितीला विनंती केली.