मुल तालुक्यातील चांदापूर (हेटी) येथील हिमानी किराणाचे मालक अण्णाजी ठाकूर अवैध सुगंधित तंबाखू विक्री चा साठा पोलिसांनी पकडले.
★ वेगवेगळ्या कपंनीचे एकुन 3,22,230/- रुपये
रुपयांचा माल जप्त.
एस.के.24 तास
मुल : मानवी जिवीतास अपाकारक असलेल्या सुंगधीत तंबाखुचे अवैध विक्रि वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केला असतांना सुध्दा चंद्रपुर जिल्हायातील काहि अवैध विक्रेते हे बेकायदेशिररित्या त्यांचे ताब्यात अशा प्रकारचा प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु बाळगुन अवैध विक्रि करीत असल्याने अशा प्रकारच्या अवैध विक्रेत्यांवर अंकुश बसावा याकरीता मा.श्री.मुमक्का सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी चंद्रपुर जिल्हयातील अशा प्रकारच्या अवैध व्यावसायावर रेड करुन प्रभावीपणे कायदेशिर कारवाई करण्यासंबधात आदेशीत केले.
मा.परि.पोलीस उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मुल यांचे आदेशान्वये दिनांक 20.02.2024 रोजी पोलीस उप निरीक्षक भाऊराव बोरकर पोलीस स्टेशन मुल हे सोबतचे पोलीस पथकासह मुल शहरात अवैध व्यवसाय रेड कारवाई करीता पेट्रोलींगवर असतांनाचे दरम्यान गोपनिय सुत्राकडुन माहिती मिळाली की,
मौजा चांदापुर (हेटी) ता.मुल जिल्हा चंद्रपुर येथील हिमानी किराणा दुकाणदार अण्णाजी ठाकुर हा त्याचे मालकिचे किराणा सामान विक्रिचे दुकाणामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मजा-108, ईगल, होला अशा वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधीत तबाखु अवेध विक्री करण्याकरीता बाळगला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने मा. परि. पोलीस उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी यांना अवगत करुन मौजा चांदापुर (हेटि) येथील हिमानी किराणा दुकाणात सुगंधित तंबाखु संबधात झडती झडती घेतली.
अण्णाजी उमाजी ठाकुर व्यवसाय किराणा दुकाण रा. चांदापुर (हेटि) ता. मुल जि. चंद्रपुर याचे ताब्यात ताब्यात 1) एकुन 1,10,400/- रुपये प्रत्येकी 184/- रुपये किमंतीचे 200 ग्रॅम वजनाचे होला हुक्का शिशा तंबाखु 600 पाऊच
2) एकुन 1,17,500/- रुपये प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे एकुन 500 नग मजा 108 प्रती डब्बा 235/ रुपये प्रमाणे
3) एकुन 12,400/- रुपये प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे ईगल तंबाखु चे 40 पाऊच प्रति पाऊच किमंत 310/- रुपये
4) एकुन 14,080/- रुपये प्रत्येकी 40 ग्रॅम वजनाचे ईगल तंबाखु चे 220 नग पाऊच प्रति पाऊच किमंत 64/- रुपये
5) एकुन 18,000/- रुपये पांढऱ्या रंगाचे चुंगळी मध्ये एकुन 150 नग विमल पान मसाला सिलबंद पॉकेट सदरचे पॉकेट 25 ग्रॅम वजनाचे असुन ज्यावर प्रति 120/- रुपये किमंतीचे
6) एकुन 46,750/- रुपये प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे एकुन 50 नग मजा-108 हुक्का शिशा तंबाखु प्रति डब्बा विक्रि किमंत 935/- रुपये प्रमाणे
7) एकुन 3,100/-रुपये प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे 10 ईगल हुक्का शिशा तंबाखु विक्रि किमंत 310/- रुपये प्रमाणे अशा प्रकारे वेगवेगळ्या कपंनीचे एकुन 3,22,230/- रुपये किमंतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु नमुद इसमाचे ताब्यातुन जप्ती करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री. मुमक्का सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. श्री. दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी प्रभार मुल, मा.श्री. प्रमोद चौगुले परि. पोलीस उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मुल, मा.श्री.सुमीत परतेकी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भाऊराव बोरकर, सोबतचे पथकातील पोहवा/1735 अनिल शेडमाके, पोअंम/2765 विशाल वाढई, पो.अंम./1596 आतीष मेश्राम, म.पोअंम/2774 पुजा मेश्राम
चालक अंमलदार अंमलदार/2108 डेवीड भलवे यांनी केली आहे. अशा प्रकारच्या प्रभावी कारवाई मुळे सुगंधीत तंबाखुची अवैध दारु विक्रि करणारे तसेच चोरटया मार्गाने सुंगधीत तंबाखुची बेकायेशिर रित्या वाहतुक करणा-या इसमांचे तसेच अशा प्रकारच्या अवैध धंदयाशी निगडीत लोकांचे धाबे दणानले आहेत.