ब्रम्हपुरी तालुक्यातील रुही येथील समीर चहांदे 3 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी देसाईगंज वडसा विक्री करतांना रंगेहाथ पकडून 6 दुचाकी जप्त करून अटक केली.
एस.के.24 तास
वडसा : विविध ठिकाणांवरून सहा दुचाकी वाहनांची चोरी करणारा आरोपी देसाईंगंज पोलिसांच्या हाती लागला. चोरीतील वाहन विकण्यासाठी देसाईगंजमध्ये आला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या.
समीर राजरतन चहांदे वय,36 वर्षे रा.रुही पो.निलज, ता.ब्रम्हपुरी असे त्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी समीर चहांदे याने विविध ठिकाणांरून 6 दुचाकी वाहने चोरली होती. त्यातीलच एका वाहनाची तो देसाईगंज मध्ये विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती देसाईगंज ठाण्याचे सपोनि आगरकर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्यांनी समीर याला ताब्यात घेतले.
या आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता, सदर आरोपीवर देसाईगंज आणि आरमोरी पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. या व्यतिरिक्त सदर आरोपीने पाथरगोटा जि.गडचिरोली गावाच्या हद्दीतून एक दुचाकी वाहन जप्त केले.
अधिक तपासात सदर आरोपीवर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरी,बलात्काराचेही गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. पुढील तपास देसाईगंज ठाण्याचे सपोनि आगरकर करीत आहेत. अधिक तपास कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.