गडचिरोली - चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) गडचिरोली वैनगंगा नदीच्या पात्रात 3 सख्या बहिणी बुडाल्या ; 2 मृतावस्थेत मिळाल्या 1 मुलीचा शोध युध्द पातळीवर सुरू.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक
सावली : गडचिरोली - चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) गडचिरोली वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील
1) कु.प्रतिमा प्रकाश मंडल वय,23 वर्ष
2) कु.कविता प्रकाश मंडल वय,21वर्ष
3) कु.लिपिका प्रकाश मंडल वय,18 वर्ष
या 3 बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे.या 3 बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला असता 2 मृतावस्थेत मिळाल्या 1 मुलीचा शोध सुरू आहे.एकूण 5 जण बुडाले होते.त्यापैकी 2 मुली पहिलेच वाचविण्यात यश आले आहे.सदर घटना ही दुपार च्या सुमाराची आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते.चंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल,कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या.