जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 2,विरूळ (आ.) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात साजरा.
★ सांस्कृतिक महोत्सवात बालकांच्या कलागुणांची उधळण.
एस.के.24 तास
वर्धा : जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 2, विरूळ (आ.) ता.आर्वी.जिल्हा.वर्धा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा.सौ.शिल्पाताई देऊळकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर्वी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मा.श्री सुरेश पारडे साहेब, माजी पं.स.सदस्य सौ. शोभाताई मनवर,माजी सरपंच श्री दुर्गाप्रसादजी मेहरे
हुसेनपूर च्या उपसरपंच मा.सौ.साधना मुंडेकार, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री कैलासजी उपासे,विरूळ केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.विजय लोणारे,सोरटा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.विलास तराळे,तलाठी श्रीमती मीनल माळोदे,डॉ. जयश्री सोनवणे, विशेष शिक्षक श्री सुनील शंभरकर, आरोग्य कर्मचारी श्री.गजानन थेटे,शाळा व्य.स.चे उपाध्यक्ष श्री.सुशील नेवारे,जि.प.केंद्र,शाळेचे मुख्याध्यापक श्री.नाखले सर उपस्थित होते.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळा स्तरावर घेतलेल्या विविध क्रिडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रात प्रावीण्य दाखवणार्या ' अमोली अंबादास पटेकार ' या विद्यार्थिनीचा ' उत्कृष्ट विद्यार्थी ' म्हणुन गुणगौरव करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद मिळविली. जि.प.प्रा. केंद्रशाळा विरूळ तथा अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सुध्दा आपल्या कलेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शितल वडनेरकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूनम हनवते यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती भाग्यश्री मुडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती बनसोड मॅडम तसेच शाळेची माजी विद्यार्थीनी कु. आचल मून यांनी सहकार्य केले.