सिंदेवाही येथे 13 तारखेला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
सिंदेवाही : मेळाव्यात वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून 1200 जागा उपलब्ध असून त्यासाठी बल्लारशा ,पोंभूर्णा ,सावली नागभीड ,आरमोरी,मुल, सिधेवाही, नागभिड या परिसरातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांती दल व अखिल भारतीय माळी महासंघ यांचा आहे व त्यासाठी शेकडो कार्यकर्ते कार्यरत असून आता एकच ध्यास रोजगार देऊन युवकांना खास व यासाठी मूल तेथे शेकडो कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये प्रामुख्याने ऍड.राजेंद्र महाडोळे,अनिल सोनुले, ओम देव मोहुरले, नंदू बारस्कर श्रीरंग नागोसे, प्रदीप वाढई, गुरु भाऊ भेंडाळे, सतीश चौधरी, किसन गुरनूले ,अशोक चौधरी ,लोमेश कडूकार, सुभाष लनगुरे ,मनोज लेनगुरे, सत्यवान मोहरले, नरेश शेंडे, राजेंद्र वाढई, सौ उषाताई शेंडे ,विजय गुरनुले, जितेंद्र मोहरले, विनायक निकोडे,बालाजी निकोडे ,सुभाष सोनुले दिलीप मोहुर्ले, गजानन चौधरी इत्यादी प्रामुख्याने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.