चंद्रपूर पडोली जवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.

चंद्रपूर पडोली जवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.


एस.के.24 तास


चंद्रपूर : चंद्रपूर जवळील पडोली पोलीस ठाण्यांतर्गत पडोली - घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाडा गावाजवळच्या एका वीटा भट्टीवर काम करणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 


या घृणित कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पीडित चिमुकलीचे आई - वडील चिंचाडा गावाजवळच्या एका वीटभट्टीमध्ये काम करतात.शुक्रवारी सकाळी 10 :00 वा.आई-वडील त्यांच्या मुलीला झोपडीत झोपवून कामावर गेले होते.तेव्हा तिथे काम करणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई - वडील तातडीने झोपडीत पोहोचले आणि अल्पवयीन मुलाला पकडले. मुलीच्या आई - वडिलांनी पडोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपीला पकडून बाल सुधारगृहात पाठवले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 376 (अ) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !