ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावाच्या 10 कि.मी परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. - बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश.

ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावाच्या 10 कि.मी परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. - बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश.


मिथुन कलसार ! प्रतिनिधी ! एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : तालुक्यातील मौजा मांगली येथील कुकुट पक्षांमध्ये 25 जानेवारी 2025 मरतूक दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने गोळा करून राजस्थरीय पशुरोग अन्वेषण पुणे व भूपाळ येथील भारतीय अनुसंधान परिषद तुझं उच्च परिषद पशुरोग संस्था या प्रयोग शाळेत सादर करण्यात आले होते.


 सदर नमुने बर्ड फ्लू (AVIAN INFLUENZA H5 N1) पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये  याकरिता मांगली गावच्या दहा कि.मी त्रिजेतील क्षेत्र "सतर्कभाग" (Alert Zone) म्हणून घोषित केला आहे तसेच सदर पुढील परिसरात पुढील प्रमाणे आवश्यकता त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास निर्देश दिले आहे

      

बाधित क्षेत्रात मांगली गेवर्ला चक व जुनोनाटोली येथील कुक्कुटपक्षी जलद प्रतिसाद दलामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्षांना मारण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे तसेच मृत पक्षांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट करण्यात येणार आहे. बाधित क्षेत्रातील उर्वरित  पशुखाद्य अंडी इत्यादीचे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये - जा करण्यास सक्त मनाई करण्यात आली.


असून त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे तसेच प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुकूटपक्षी, अंडी कोंबडीखत पक्षीखाद्य अनुषंगिक इत्यादींच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. 

       

प्रभावित पोल्ट्री फार्म चे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के परिसर सोडियम हायप्लोकराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्राच्या पाच किमी त्रिज्येतील परिसरात कुकुट पक्षांची खरेदी विक्रीचे दुकाने मासांची दुकाने वाहतूक बाजार व यात्रा प्रदर्शन इत्यादी बाबी बंद राहतील. 

 

नागरिकांना आवाहन : - 

उकडलेली अंडी शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये व अफ़वा गैरसमज पसरवू नये जिल्ह्यात कुठेही पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये किंवा 1962 च्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !