टिसीओसी कालावाधीच्या सुरुवातीलाच 04 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण.

टिसीओसी कालावाधीच्या सुरुवातीलाच 04 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,03/02/2025 शासनाने जाहिर केले होते एकुण 28 लाख रूपयांचे बक्षिस.एक डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह, एक एसीएम (Area Committee Member) व दोन सदस्य पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण.


दोन पती-पत्नी जोडप्यांनी आत्मसमर्पण करुन स्वीकारला सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग.शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. 


त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 695 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 


आज दिनांक 03 फेब्राुवारी 2025 रोजी 01 डी.व्हि.सी.एम.,01 ए.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य अशा एकुण 04 जहाल माओवादी नामे 1) अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर, डी.व्हि.सी.एम टेक्नीकल टीम, वय 63 वर्षे, रा. अर्कापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, 2) वनिता दोहे झोरे, एसीएम टेक्नीकल टीम, वय 54 वर्षे, रा. कोरनार, ता. एटापल्ली. जि. गडचिरोली, 3) साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर, प्लाटून-32 सदस्य, वय 30 वर्षे रा. तुमरकोडी, ता. भामरागड जि. गडचिरोली व 4) मुन्नी पोदीया कोरसा, पार्टी सदस्य, वय 25 वर्षे, रा. सिलीगेंर ता. कोळा, जि.सुकमा (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.



आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

1) अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर दलममधील कार्यकाळ 

सन 1991 मध्ये अहेरी दलम मध्ये भरती होवून 1995 पर्यंत कार्यरत 


सन 1995 ते 1997 पर्यंत बालाघाट परिसरात ताडा दलम (म.प्र.) मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होवून कार्यरत.


सन 1998 ते 1999 अहेरी दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता.


सन 2000 मध्ये चामोर्शी दलममध्ये कंमाडर पदी पदोन्नती होवून सन 2003 पर्यंत काम केले.

 

सन 2003 साली डिव्हिसीएम पदावर पदोन्नती होवून चामोर्शी दलममध्ये सन 2005 पर्यंत कार्यरत.


सन 2005 ते 2007 पर्यंत अहेरी दलम कंमाडर म्हणून काम केले.


सन 2007 ते 2017 पर्यंत नक्षल साहित्य शिक्षण सामितीमध्ये कार्यरत राहुन नियुक्ती दलमसोबत नक्षल संघटनेबाबात शिक्षण देण्याचे काम केले.


सन 2018 मध्ये टेक्नीकल टिममध्ये बदली होवून आजपर्यंत कार्यरत.


कार्यकाळात केलेले गुन्हे : - 

अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर  याच्यावर आजपर्यंत एकुण 82 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 31 चकमक, 17 जाळपोळ,  व 34-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

 2) वनिता दोहे झोरे 

दलममधील कार्यकाळ


सन 1993 मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती होवून सन 1995 पर्यंत कार्यरत. 


सन 1995 मध्ये टिपागड दलममध्ये बदली होवून सदस्य पदावर सन 1999 पर्यंत कार्यरत.


सन 1999 मध्ये नॅशनल पार्क महिला दलम मध्ये कंमाडर पदावरा पदोन्नती होवून कार्यरत.


सन 2005-2006 मध्ये टेक्कामेट्टा जवळपासच्या गावात जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम केले.


सन 2006 ते 2010 पर्यंत अबुझमाड मधील जटवाही, कुतुल, नेलनार या गावात 04 वर्ष जनताना स्कुलमध्ये शिक्षक म्हणून काम केले.


सन 2010 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होवून कार्यरत होती.


सन 2010 ते 2019 मध्ये गावागावात जाऊन मिटींग घेवुन जनताना सरकारसाठी काम केले.


सन 2019 ते 2022 पर्यंत उसेवाडा एरीयामध्ये काम केले.


सन 2022 मध्ये टेक्नीकल टीममध्ये बदली होवून आजपावेतो कार्यरत होती.


कार्यकाळात केलेले गुन्हे : - 


वनिता दोहे झोरे हिच्यावर आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01- चकमक, 02- जाळपोळ, व 08- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.


3) साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर


दलममधील कार्यकाळ : -


सन 2011 मध्ये जनमिलिशिया म्हणून भरती होवून भामरागड दलमसोबत सन 2012 पर्यत काम केले.


सन 2012 मध्ये सदस्य पदावर बढती होवून भास्कर हिचामी याचा अंगरक्षक म्हणून सन 2017 पर्यंत काम केले.


सन 2017 मध्ये कसनसूर दलममध्ये बदली होवून कार्यरत.


सन 2018 मध्ये कसनासुर-बोरीया चकमकीमध्ये जखमी झाल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये स्टाफ टिममध्ये बदली होवून सन 2021 पर्यंत काम केले


माहे जुलै 2021 मध्ये प्लाटून 32 मध्ये बदली होवून आजपर्यत सदस्य पदावर कार्यरत होता. 


कार्यकाळात केलेले गुन्हे : - 


साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर  याच्यावर आजपर्यंत एकुण 04 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02- चकमक व 02- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.


4) मुन्नी पोदीया कोरसा

दलममधील कार्यकाळ : - 


सन 2015 मध्ये बासागुडा दलममध्ये भरती होवून कार्यरत


सन 2016 मध्ये प्लाटून क्र. 07 सदस्य पदावर बदली होवून सन 2018 पर्यंत कार्यरत होती.


सन 2018 मध्ये प्लाटुन क्र. 32 मध्ये प्लाटून मेंबर म्हणून बदली.


सन 2019 मध्ये सप्लाय टिममध्ये बदली होवून सन 2021 पर्यंत कार्यरत होती.

* सन 2021 मध्ये माड डिव्हिजन मध्ये बदली होवून जनताना सरकार स्कुलमध्ये शिक्षक म्हणून आजपर्यंत काम केले.


कार्यकाळात केलेले गुन्हे : - 


हिंसक घटनांमध्ये तिचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.


आत्मसमर्पीत होण्याची कारणे : - 

गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.


नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.


चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात,मात्र महिला यात ठार मारल्या जातात.


खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.


माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.


दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.


वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.


शासनाने जाहिर केलेले बक्षीस : - 


महाराष्ट्र शासनाने अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.


महाराष्ट्र शासनाने वनिता दोहे झोरे हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.


महाराष्ट्र शासनाने साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.


महाराष्ट्र शासनाने मुन्नी पोदीया कोरसा हिच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.


आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शामला अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वनिता दोहे झोरे हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन काजल मुन्नी पोदीया कोरसा हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडून पती-पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


अशोक पोच्या सडमेक ऊर्फ बालन्ना ऊर्फ चंद्रशेखर व त्याची पत्नी वनिता दोहे झोरे यांना एकुण 15 लाख रुपये तसेच साधू लिंगु मोहंदा ऊर्फ शैलेश ऊर्फ समीर व त्याची पत्नी मुन्नी पोदीया कोरसा यांना एकुण 11 लाख रुपये पुनर्वसनाकरीता बक्षीस म्हणून मिळणार आहे.


आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 04 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.


गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 50 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 17 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 


सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री.संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री.अंकित गोयल,पोलीस उप-महानिरीक्षक,गडचिरोली परिक्षेत्र, श्री.अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ,श्री.नीलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !