आदर्श गाव कळमना येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट. ★ उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढईंच्या पुढाकाराने गावात सुरू असलेल्या उपक्रमांची केली पाहणी.

आदर्श गाव कळमना येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट.


★ उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढईंच्या पुढाकाराने गावात सुरू असलेल्या उपक्रमांची केली पाहणी. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील आदर्श गाव मौजा कळमना येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन येथील उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने गावात सुरू असलेल्या विविध उपक्रम तथा राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी व गावकऱ्यांशी संवाद साधून त्याबद्दल माहिती घेतली. तसेच गावातील लोकप्रतिनिधी व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी कामांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी यांच्या भेटीमुळे संपूर्ण कळमनावाशी नागरिक भारावून गेले असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

       



कळमना येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी नागरिकांच्या सहकार्याने राष्ट्रगीताने गावाची दैनिक सुरूवात, स्वच्छ, सुंदर, हिरवे गाव, आकसिजन पार्क, सुंदर, स्वच्छ व मार्डन शाळा, सुसज्ज बंदिस्त गटारे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवगार झाडे, सी. सी. टी. व्हि कॅमेऱ्याने गावाची सुरक्षा, मुख्य चौकात एल ई डी वर लाऊन लाईव्ह टेलिकास्ट


विविध शासकीय योजनांचा मोठा निधी उपलब्ध करून योजनांची दर्जेदार अमलबजावणी, व्यसनमुक्ती अभियान, टाकावू वस्तू पासून टिकावू वस्तू, बागबगेचे अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांची यशस्वी अमलबजावणी येथे पहायला मिळतात. या सर्व उपक्रमांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

           

यावेळी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रा. प. सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळसेंडे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, प्रियंका गेडाम, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामसेवक सिताराम मरापे


माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, मुख्याध्यापिका दुधे, शिक्षक दिलीप निमकर, शालीक पेंदोर, वनिता गौखरे, प्रा. साबळे, प्रा. बल्की, भाऊराव कावळे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, कळमना ग्रामसंघ, महिला बचतगट च्या महिला, स्थानिक नागरिक, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 


कळमना येथे अतिशय कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने जनसहभागातून विविध शासकीय योजनांची परिणामकारक अमलबजावणी करून खुप छान उपक्रम सुरू आहेत. हे सर्व पाहून आनंद झाला. यापुढेही आनखी उम्मेदीने नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवून गाव स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि अत्याधुनिक सुविधा संपन्न एक आदर्श गाव कायम टिकून राहण्यासाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कळमन हे गाव उत्कृष्ट आदर्श गाव बनण्यासाठी गावात प्रधानमंत्री सुर्य सोलर योजनेचा लाभ घेऊन विज बिल मुक्त गावाकडे वाटचाल करावी यासाठी सरपंच वाढई व  गावकऱ्यांनी निश्चितपणे प्रयत्न करावेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात या गावाला नावलौकिक मिळाल्यावर मी पुन्हा येथे भेट देईन. - विनय गौडा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर


मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे संपूर्ण कळमनावाशी नागरिक भारावून गेले आहेत. गावकऱ्यांप्रमाणेच मलाही खूप आनंद झाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण कळमना गावात जनसेवेचे व्रत घेऊन गावाला अत्याधुनिक सुविधा संपन्न, पर्यावरणपूरक आणि आदर्श गाव बनविण्यासाठी आपण काम करीत असून मला या कामात गावकऱ्यांनी पावलोपावली खंबीरपणे उभे राहून सहकार्य केले. त्यामुळेच एक आदर्श गाव अशी ओळख निर्माण करण्यात यश आले.यापुढेही या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत राहणार आणि गावाचे नाव राज्य ते देश पातळीवर उंचावण्यासाठी काम करीत राहु. - नंदकिशोर वाढई. उपक्रमशील स्मार्ट सरपंच,कळमना

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !