महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस रीजनिंग डे साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - ०२/०१/२५ दिनांक ०२/०१/२५ ला महाराष्ट्र पोलीस स्थापना रीजनिंग डे दिवसा निमित्त जिल्हा परिषद माजी माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगे मॅडम ,पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ,तसेच अल्पवयीन मुलं मुली पळून जातात याविषयी त्यांनी शिक्षणाच्या वया मध्ये शिक्षण घ्यायलाच पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांच्या दैनंदिन जीवनामध्ये पोलिसांचे कर्तव्य का असतात तसेच पोलीस स्टेशनच्या कामकाज कशा पद्धतीने चालतो ,याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाची वेळी शाळेचे मुख्याध्यापक रामटेके सर ,सर्व शिक्षक मुले,मुली हजर होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठे सहकार्य केले.