७६ वा गणराज्य दिन ध्वजारोहण करून ग्रामपंचायत पटांगणात विविधरंगी नृत्य कार्यक्रमाने संपन्न.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपूरी - २६/०१/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे ७६ वा गणराज्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सेवा सहकारी सोसायटी , बालगोपाल दुग्ध संस्था येथील ध्वजारोहण आटोपून विकास विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक - शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय सहारे तथा सदस्य,अंगणवाडी सेविका - मदतनीस, ग्रामपंचायत सचिव रतिराम चौधरी, उपसरपंच जितेंद्र क-हाडे, माजी सैनिक सुभाष ठेंगरे,पोलीस पाटील अकुल राऊत , तंटामुक्ती अध्यक्ष होमराज राऊत , आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी लिपिक दिवाकर ठेंगरे व संगणक ऑपरेटर, अभ्यासिकेतील अभ्यासू विद्यार्थी, शरद तलमले बँक कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, बहुसंख्य उपस्थित महिला - पुरुष यांच्या उपस्थितीत सरपंचा सौ. दामिनीताई चौधरी यांनी ध्वजारोहण केले असता उपस्थितांनी मानवंदना दिली.
ध्वजारोहण झाल्यानंतर शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्याध्यापक देवानंद तुलकाने, ग्रामपंचायत सचिव रतिराम चौधरी यांनी उपस्थित ग्राववासीयांना कुष्ठरोग व टीबी मुक्त भारत याविषयीची शपथ दिली.
गतवर्षी (२०२४) ग्रामपंचायत पटांगणात झालेल्या गणराज्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण नारायण रावजी ठेंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य , ग्रामपंचायत सचिव रतिराम चौधरी, सरपंचा सौ. दामिनी चौधरी , उपसरपंच जितेंद्र क-हाडे, अमरदीप लोखंडे , अकुल राऊत , संघमित्रा लोखंडे माजी सभापती, पत्रकार प्रशांत राऊत व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर यांच्या हस्ते मुख्याध्यापक देवानंद तुलकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मुख्याध्यापक मंगल धोटे विकास विद्यालय ,अ-हेरनवरगांव यांना देण्यात आले.
तसेच
" माझ्या स्वप्नातील अ-हेरनवरगांव " या निबंध स्पर्धेतील १)प्रथम क्रमांक - कु. प्रणाली शामराव करानकर २)द्वितीय क्रमांक - नैतिक किशोर सहारे
३)तृतीय क्रमांक - सलोनी राजकुमार पिलारे या विजेत्या स्पर्धकांना सुद्धा उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आलेले सन्मान चिन्ह व सौ. वैशाली लोखंडे यांचे कडून भारताचे संविधान पुस्तक देऊन त्यांचा गौरव केला.
निबंध स्पर्धेचे संकलन व परिक्षण सुरज टेंभूरकर,शरद तलमले, कार्तिक वैद्य, मोहीत ठेंगरे यांनी लिखाणातील बारीक-सारीक गोष्टी तपासून उत्कृष्ट क्रमांकाची निवड केली.
बक्षीस वितरण झाल्यानंतर लगेच विकास विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी - विद्यार्थीनींनी उत्कृष्ट एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गाण्यावरती नृत्य, दर्शनी कवायत करून उपस्थित गाववासीयांना मंत्रमुग्ध केले व त्यांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देवानंद तुलकाने , पाथोडे,मेश्राम सर यांनी केले.कार्यक्रमानंतर लगेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.