अ-हेरनवरगांव येथे ताज मेहंदी बाबाचा जागृती,दहीकाला आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,२६/०१/२५ ओम जय जगद्गुरु ताज मेहंदी बाबा सेवक मंडळाच्या वतीने भव्य ताज मेहंदी बाबाचा जागृती दहीकाला आणि महाप्रसाद दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन विकास विद्यालय, अ-हेरनवरगांवच्या पटांगणात करण्यात आले.दिनांक २५ जानेवारीला ताज मेहंदी बाबाच्या फोटोंची स्थापना कार्यक्रमाचे उद्घाटन अशोकजी भैय्या माजी नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी
यांनी सतीश ठेंगरे सचिव विकास एज्युकेशन सोसायटी अ-हेरनवरगाव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी दामिनी ताई चौधरी ग्रामपंचायत सरपंचा, नवनाथ तरारे, सुरेश आडकिने, हरिनारायण बेद्रे पटवारी उराडे, अमरदीप लोखंडे, प्रभू कुथे सचिव हनुमान देवस्थान यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ४-०० वाजता दीप प्रज्वलन करून स्थापना केली.
सायंकाळी ६-०० वाजता शंकर भाऊ भोयर अध्यक्ष बीड दरबार संस्थान बीड व तरारे महाराज पिंपळगाव( भोसले )यांनी ताज मेहंदी बाबा यांची ज्योत प्रज्वलन केली.रात्रो ताज मेहंदी भजन मंडळ आजगांव ,सावलगांव पिंपळगांव (भोसले) ,बेटाळा आणि कुर्झा या गावातील भजन मंडळांचा विविध रंगी ताज मेहंदी बाबांच्या जीवनपटावर भजनांचा कार्यक्रम करण्यात येऊन रात्रोचे जागरण करण्यात आले.
दिनांक २६ ला ताज मेहंदी बाबाची मिरवणूक काढण्यात येऊन दही काल्याचा कार्यक्रम कृष्णाभाऊ सहारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, चंद्रपूर, विलास उरकुडे माजी उपसभापती ब्रह्मपुरी, पत्रकार प्रशांत राऊत , गजानन ढोरे सरपंच चिंचोली,चंद्रकांत दोनाडकर,श्रीराम बगमारे, नवनाथ तरारे , शंकरजी भोयर अध्यक्ष ताज मेहंदी बाबा संस्थान बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दही काल्यानंतर महाप्रसाद भोजनदान देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाहेरगाव वरून आलेले ताज मेहंदी बाबा सेवक, मंडळाचे पदाधिकारी, ओम जय जगद्गुरु ताज मेहंदी बाबा सेवक मंडळअ-हेरनवरगांव आयोजन समिती पदाधिकारी किशोर चौधरी ,ब्रह्मदास भागडकर,सुभाष सहारे , दिनेश ठेंगरे , गणेश जीभकाटे,रामू देवढगले, ललित शिवणकर, मधुकर दाणी व सेवक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले आणि सदर कार्यक्रम शांतते पार पाडला.