युवकांनी विधायक कार्याकरिता पुढे यावे : श्री.अशोकजी भैया
अमरदीप लोखंडे !! सहसंपादक
ब्रम्हपूरी - २०/०१/२५ भारत हा युवका़ंचा देश आहे, युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. जगात ज्या क्रा़ंत्या झाल्या त्या युवका़नी केल्या आहेत. तेलगंना राज्याच्या मागणी करिता युवका़ंनी आंदोलन केले. लहान राज्यामुळे विकासाच्या दृष्टीने युवकांना रोजगार मिळत असतो . लहान राज्यांमुळे देशाचा विकास होतो. आज युवक हा बेरोजगार आहे त्याला रोजगार उपलब्ध नाही.
तेव्हा देश व समाजाच्या जडणघडणीत भरीव योगदान युवकांचे असते. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर हे युवका़ंचे उन्नयन करणारे व्यासपीठ आहे. देश भक्ती राष्ट्र प्रेम मूल्याची बीजपेरणी होत असते यातून बरेच विद्यार्थी नेतृत्व कौशल्य प्राप्त करुन विविध क्षेत्रात आपले करिअर घडविण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजना विचार म़ंच हे एक उत्तम मार्ग आहे.
यासाठी युवकांनी स्वय़ंप्रेरणेने विधायक कार्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. असे श्री अशोकजी भैया यांनी पारडगाव येथे आयोजित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय व शांताबाई भैया महिला महाविद्यालय ब्रम्हपुरी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शनातून मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रमोद बानबले ठोणेदार पो स्टेशन ब्रम्हपुरी ,
प्रा.एस.आर बजाज सदस्य ने.भै. हि शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, श्री पिंटू पिलेवान सरपंच पारडगाव, डाँ डी एच गहाणे प्राचार्य, ने हि महा.डाँ एम एस वरभे प्राचार्य शांताबाई भैया. महिला महा.डाँ सुभाष शेकोकर, मेजर विनोद नरड,सौ मनिषा लाखे मु.अ.श्री सुधिर पिलारे उपसरपंच, ईश्वर ढोरे अध्यक्ष शाळा समिती, श्री राहुल प्रधान पोलिस पाटील डाँ प्रकाश वट्टी व सन्मानिय ग्रापंचायत सदस्य उपस्थित होते.