मुल येथे नवभारत कन्या विद्यालयाच्या वतीने " तिरंगा मॅराथान "
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : विद्यार्थी तिरंगाविषयी अभिमान वाटावा याकरीता, नवभारत कन्या विद्यालयाचे वतीने दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी तिरंगा मॅराथानचे आयोजन केले आहे.मूल येथील गांधी चौकातून ही मॅराथान सुरू होणार असून, ती तहसील कार्यालय परिसरात जाईल. हातात तिरंगा ध्वज घेवून शेकडो विद्यार्थीनी या मॅराथान मध्ये सहभागी होणार आहे.
गांधी चौक मूल येथे सुरूवातीला देशभक्तीपर गिते सादर केली जाणार आहे.आकाशात तिरंगी फुगे सोडून मॅराथानची सुरूवात केली जाणार आहे.या तिरंगा मॅराथानचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड.अनिल वैरागडे यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अजय चरडे, शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे सचिव शशीकांत धर्माधिकारी, तहसिलदार मृदुला मोरे, ठाणेदार सुमीत परतेकी, मुख्याधिकारी संदीप दोडे, संवर्ग विकास अधिकारी राठोड, वैद्यकीय अधिक्षक कुळमेथे, गटशिक्षणाधिकारी वर्षाताई पिपरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तिरंगा मॅराथानला नागरीकांनी उपस्थित राहून विद्यार्थाना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार यांनी केले आहे.