स्वतःला ओळखून ध्येय निश्चित करा. - चंदू पाटील मारकवार
★ वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,११/०१/२५ " आज आमच्या समोर खूप समस्या आहेत.चित्रपट,क्रिकेट व राजकारणाशिवाय कुणाला काही सूचत नाही.आपल्याकडे ज्ञान आहे पण प्रकटीकरण नाही.आपल्यात कला असेल तर जीवन रंगविता येते.मोबाईल आपल्यावर राज्य करते आहे.जे पेराल ते उगवेल म्हणून आधी स्वतःला ओळखा व यश गाठण्यासाठी ध्येय निश्चित करा " असे मार्मिक भाष्य आदर्श गाव राजगढचे कृषी तज्ज्ञ, समाजसेवक चंदूपाटील मारकवारांनी केले.
ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय व शांताबाई भैया महिला महाविद्यालय आयोजित 'वार्षिकोत्सव २०२४-२५' व शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण सोहळात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विचारपिठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया होत्या तर उद् घाटन संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले. प्रमख अतिथीमध्ये संस्थेचे सहसचिव अँड भास्कर उराडे,मेजर विनोद नरड होते तर उपस्थितीत प्राचार्य डॉ डी एच गहाणे उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, प्राचार्य डॉ एम एस वरभे, डॉ हर्षा कानफाडे, छात्रसंघ प्रतिनिधी पंकज भोयर,समीक्षा पंडीत,सलोनी भांडारकर, सुषमा ठुसे उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक भैयांनी २४/७ चा फार्मुला सांगून मेहनत करुन महाविद्यालयाचे नाव रोशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात श्रीमती स्नेहलताबाई भैयांनी, महाविद्यालयाची अशीच शैक्षणिक प्रगती वाढत राहो,अशा सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते १६० विद्यार्थ्यांना संस्था व प्राध्यापकांकडून शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण करण्यात आली.
संचालन प्रा.खोब्रागडे,डॉ ज्योती दुपारे,प्रा.अन्सारीने केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे नी केले तर संचालन वार्षिकोत्सव प्रभारी डॉ वर्षा चंदनशिवेनी व आभार शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती प्रभारी डॉ सुनिल चौधरींनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,डॉ.तात्याजी गेडाम,डॉ.असलम शेख,डॉ धनराज खानोरकर,डॉ.मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर
अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ भास्कर लेनगुरे, डॉ किशोर नाकतोडे,प्रा बालाजी दमकोंडवार,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,डॉ अरविंद मुंगोले, डॉ मिलिंद पठाडे,प्रा दलेश परशुरामकर,डॉ अतुल येरपुडे, डॉ दर्शना उराडे,प्रा निलिमा रंगारी,प्रा रुपेश वाकोडीकर व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारींनी मोलाचे सहकार्य केले.