डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०५/०१/२५ स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे वार्षिकोत्सव - २०२५ अंतर्गत क्रीडा-महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक ०४/०१/२५ रोजी पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या सर्व क्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या अंगभूत गुणांना प्रदर्शित करावे असे आवाहन केले.
या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. प्रकाश उके विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून आणि विद्यापीठ गिताने झाली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीं मान्यवरांचे लेझीमद्वारे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान अवताडे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापकवृंद आणि एन.सी.सी. कॅडेटस उपस्थित होते.