ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी - मेंडकी रस्त्यावर कार व दुचाकी चा सामोरासमोर धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३०/०१/२५ तालुक्यातील गांगलवाडी - मेंडकी रस्त्यावर मारुती सुझुकी कार क्र.MH.31 EK 6790 हि बालापूर तळोधी वरून गांगलवाडी कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने म्हणजे गांगलवाडी वरून आपले स्वगवी स्पेंडर प्लस क्र.MH.34.AT 2938 ह्या मोटासायकलने अशोक फकिरा जनबनधुं वय, 60 वर्ष,माजी सदस्य ग्राम पंचायत मेंडकी यांची जोरदार धडक बसली त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला असून रस्त्यावर मृतकाचा एक हात तुटून पडला.
या घटनेत कार चालक आरोपी आदित्य रवींद्र हांडेकर वय,21 वर्ष रा.गोविंदपुर,तलोधी येथील रहिवाशी असून तो आपल्या आई वडील यांना गांगलवाडी येथील लोक विद्यालय शाळेमध्ये ने - आण करण्याचे काम करीत होता.कारण आरोपीचे आई - वडील हे शिक्षक होते.
लोक विद्यालय गांगलवाडी मध्ये सोडण्यासाठी येत असता आज अपघात झाला. कारचालक आरोपी व दोन्ही वाहने ताब्यात घेऊन मृतक अशोक फकीरा जनबंधू यांचे शव विच्छेदन करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील जिल्हा उप रुग्णालयात पाठविले आहे.घटनेचा तपास उप पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक मांदाडे व त्यांच्या सहकारी करीत आहेत.