अ-हेरनवरगांव बीट केंद्रात बीटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलनाचा शांतीपूर्ण व जल्लोषात समारोप.

अ-हेरनवरगांव बीट केंद्रात बीटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलनाचा शांतीपूर्ण व जल्लोषात समारोप.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी :  दिनांक,१८/०१/२०२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे शिक्षण विभाग पंचायत समिती , ब्रह्मपुरी अंतर्गत बीटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलन दिनांक,१५ ते १७ जानेवारी पर्यंत पार पडले.



पहिल्या दिवशी शालेय बालक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कृष्णाजी सहारे माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी विलास उरकुडे माजी उपसभापती पंचायत समिती, ब्रह्मपुरी यांच्या अध्यक्षतेखाली सौ विद्या शेळके  शिक्षण विस्तार अधिकारी बीट अ-हेरनरगांव, ओम प्रकाश बावनकुळे केंद्रप्रमुख, देवानंद तुलकाने मुख्याध्यापक जि. प. शा.अ, सौ दिपालीताई मेश्राम माजी सदस्या जि. प. चंद्रपूर, संजय सहारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अ-हेरनवरगांव 


जितेंद्र क-हाडे उपसरपंच, सतीश ठेंगरे सचिव वि.ए.सो, वामनराव मिसार, ईश्वरजी कुथे, अकुल राऊत पोलीस , बीटातील जिल्हा परिषद शाळेचे सर्व मुख्याध्यापक या विशेष अतिथींच्या  उपस्थितीत थोर समाज सुधारकांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून फित कापून उद्घाटन केले. उद्घाटनानंतर बीटातील आलेल्या सर्व शिक्षक व स्पर्धकांना शपथ देण्यात येऊन स्पर्धेची मशाल ज्योत पेटवून अ-हेर नवरगांव बीटाचे  ध्वजारोहण उद्घाटक कृष्णाजी सहारे व इतर बिटाचे प्रमुख अतिथी यांनी केले. 


बीटातील सर्व खेळाडूंची त्यांच्या नेतृत्व प्रमुख शिक्षकांची मानवंदना अध्यक्ष , उद्घाटक व अतिथी यांनी स्वीकारल्यानंतर कबड्डी  मैदानावरची फीत कापून रीतसर बालक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून कबड्डी सामन्याला सुरुवात करुन दिली.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक  खरकाटे सर यांनी आपल्या आकर्षक लेझीमच्या पथकासह पाहुण्यांना स्वागत स्थळी व्यासपीठावर पोहोचवून दिले.


सायंकाळी ५-०० वाजता तीन केंद्रातील २७ शाळेच्या सहभागी  खेळाडूंनी सांस्कृतिक संमेलनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन एकापेक्षा एक सरस वेगवेगळ्या प्रकारची समूह, वैयक्तिक नृत्य, गीत गायन भाषण , नक्कल सादर करून उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक संजय सहारे शाळा व्यवस्थापन समिती अ-हेरनवरगांव, अध्यक्ष सुभाष ठेंगरे पाटील माजी सैनिक प्रमुख अतिथी ओम प्रकाश बगमारे मुख्याध्यापक महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव( भोसले) 


अमरदीप लोखंडे,अकुलजी राऊत पोलीस पाटील, प्रशांत राऊत पत्रकार नवराष्ट्र , प्रशांत दानी, राऊत तंटामुक्ती अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची व गावकऱ्यांची कलेला दाद मिळवून प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी  १६ तारखेला माध्यमिक प्राथमिक गटाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अति तटीच्या खो, कबड्डी, वैयक्तिक रोमहर्षक स्पर्धा झाल्या.


दिनांक १७ जानेवारी २५ रोजी पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष श्री संजय सहारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व बक्षीस वितरक एडवोकेट हेमंत उरकुडे यांच्या शुभ हस्ते  विशेष अतिथी बाळकृष्णजी ठेंगरे सेवानिवृत्त शिक्षक,शरद भागडकर उपसरपंच भालेश्वर, सुभाष ठेंगरे माजी सैनिक, सौ विद्या शेळके शिक्षण विस्तार अधिकारी ब्रह्मपुरी, ओम प्रकाश बावनकुळे केंद्रप्रमुख , सोमेश्वर खरकाटे सेवाजेष्ठ शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत कबड्डी, खो,  वैयक्तिक स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा यांच्या विजेत्या चमूला व स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.


या तीन दिवस चाललेल्या बीटस्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलनासाठी २७ शाळेतील विद्यार्थ्यांना अ-हेरनवरगांव येथील दुर्गा मंडळ देवस्थान , बौद्ध समाज, तलाव देवस्थान , सरपंच दामिनी ताई चौधरी यांच्याकडून भोजन व्यवस्था करण्यात आली तर एकलव्य वाल्मिकी मंडळ, दूर्वा पिलारे दूधडेअरी, माळी समाज मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, भुलाई माता यांच्याकडून नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली. आणि विशेष म्हणजे तीन दिवस चाललेल्या स्पर्धा पाहणाऱ्यांसाठी सतीश ठेंगरे यांचे कडून मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती.


तीन दिवस झालेल्या स्पर्धेतील विजेत्या शाळा : - 


 १)सांस्कृतिक चॅम्पियनशिप विजेता- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगांव  

२) सांघिक खेळ चंपियन विजेता-

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोलारी

३) जनरल चॅम्पियनशिप - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तोरगाव खुर्द


या विजेता शाळांना सन्मानाचे शिल्ड देऊन बक्षीस वितरक एडवोकेट हेमंत उरकुडे व उपस्थित अतिथींनी विजेत्या चमूंचा सन्मान, गौरव केला. तसेच मनोज ढवळे माजी सरपंच यांनी आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ  दिलेल्या शील्ड विजेत्या चमुना  देण्यात आल्या.तीन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहारदार शेरोशायरी च्या शब्दशैलीने शिक्षक सुधीर अलोने , पाथोडे , प्रियंका निकुरे मॅडम तर आभार देवानंद तुलकाने मुख्याध्यापक , सुरज मुन यांनी उपस्थितांचे मानले.


बाल क्रीडा व सांस्कृतिक संमेलन शांतपणे पार पाडण्यासाठी अ-हेर नवरगांव बिटातील २७ शाळा मुख्याध्यापक ,शिक्षक , विद्यार्थी, विद्यार्थिनी, अ-हेरनवरगांव येथील सर्व मंडळे, स्वयंसेवक, गावातील पाणीपुरवठा आरो केंद्र , आशा वर्कर टीम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सभासद, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद अ-हेरनवरगांव शाळेचे शिक्षक , शिक्षिका, मन वेधून घेणारे आकर्षक सजावटीचे मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टिम चे मालक नरेश मदनकर,परिसरातील आलेल्या स्पर्धा पाहणारे दर्शक , बाल- गोपाल ते वयोवृद्ध पर्यंतच्या गावातील नागरिकांनी तन-मन धनाने सहकार्य करुन मोलाची साथ दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !