अवैधरित्या वाळु उपसा व चोरी करणाऱ्यास अटक ; देसाईगंज पोलीस व तालुका महसुल प्रशासन यांची संयुक्त कार्यवाही.
एस.के.24 तास
वडसा : गडचिरोली जिल्हयात अवैधरित्या वाळू उपसा व चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा यांनी वेळोवेळी कठोर कार्यवाही बाबत सूचना दिल्या आहेत.या सोबतच जिल्हाधिकारी, श्री. अविश्यांत पंडा सा. यांनी देखील महसूल प्रशासनास अवैध वाळू चोरीबाबत कठोर कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने आज दि. 23/01/2025 रोजी पो. स्टे. देसाईगंज येथील सपोनि.आगरकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की,इसम नामे अक्षय हिरालाल राऊत वय,25 वर्ष रा.कोंढाळा जि. गडचिरोली हा त्याचे ताब्यातील विना क्रमाकांच्या ट्रॅक्टर मध्ये कोंढाळा येथील वैनगंगा नदीतून रेती भरून जुनी वडसा येथे जात आहे.
अशा मिळालेल्या माहिती वरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.अजय जगताप यांना याबाबत कळवून त्यांच्या सूचनेनुसार सपोनि आगरकर, पोहवा/नंदेश्वर पोशी/बालमवार व महसूल प्रशासनाचे मंडल निरीक्षक ठाकरे व त्यांच्या स्टाफसह संयुक्तपणे सदर इसमाचा शोध घेण्याकरीता रवाना झाले. सकाळी 11.10 वा. दरम्यान संत निरंकारी भवन येथे नमुद ट्रॅक्टर चालक अक्षय राऊत हा ट्रॅक्टर घेवून येतांना दिसून येताच वाहनास हाथ दाखवून वाहन थांबविण्यात आले.
त्यानंतर सदर ट्रॅक्टर पाहणी करुन ट्रॅक्टर चालक अक्षय हिरालाल राऊत याचाकडे अधिक चौकशी केली असता, त्याचेकडील परवान्यामध्ये नमुद वाहन क्र. हे वाहन घरी असुन त्याचे सोबत असलेले रेतीने भरलेले वाहन अद्याप पासिंग झाले नसल्याचे सांगितले. तसेच परवान्यावर वाळू टाकण्याचे ठिकाण हे शिवराजपुर असे उल्लेख असल्याचे स्पष्ट असतांना प्रत्यक्षात तो वडसा शहराकडे विरुद्ध दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर इसम अवैधपणे वाळू चोरी करून वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरुन त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाजे 9,00,000 (नऊ लाख) व त्यातील अंदाजे 1 ब्रास वाळू किंमत अंदाजे 5,000 (पाच हजार) असे एकुण 9,05,000/- (नऊ लाख पाच हजार) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इसम नामे अक्षय हिरालाल राऊत वय,25 वर्ष रा.कोंढाळा जि.गडचिरोली याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कार्यवाही सदरची कारवाई जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा सा., पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील पो.नि. अजय जगताप, यांच्या नेतृत्वात सपोनि.संदीप आगरकर,पोहवा/नंदेश्वरा पोअं/विलास बालमवार व महसूल प्रशासनाचे मंडल निरीक्षक ठाकरे व त्यांचा स्टाफ यांनी संयुक्तपणे पार पाडली.