अमरदीप लोखंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
ब्रम्हपूरी : दिनांक,20/01/2025 एस.एस.जे .महाविद्यालय,अर्जुनी मोरगाव येथे दुसऱे अखिल भारतीय मातोश्री जीवन परिवर्तन मराठी साहित्य परिषद संमेलन पार पडले.या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ.परशुराम खुणे उद्घाटक सन्मा. लुनकरण चीतलांगे एस.एस.जे. महाविद्यालय संस्थाध्यक्ष, स्वागताध्यक्ष - कवी अनंता सूर सुप्रसिद्ध साहित्यिक तर प्रमुख अतिथी प्राध्या.डॉ.कवी धनराज खानोरकर, नेव.हित. महा.वि.ब्रह्मपुरी
डॉ.श्याम मोहरकर माजी प्राचार्य नाट्य समीक्षक,दिलीप बनसोड माजी आमदार तिरोडा विधानसभा क्षेत्र,डॉ.राज मुसणे प्रसिद्ध साहित्यिक , मान.प्रशांत नारायण दामले हास्य सम्राट अभिनेता, रमेश शरदराव आल्हाट चित्रपट दिग्दर्शक - कादंबरीकार, प्राचार्य ईश्वर मोहुर्ले एस एस जे महाविद्यालय ,अर्जुनी,
बहिणाबाई चौधरी म्हणून नावाजलेल्या कवयित्री अंजनाबाई खुणे,प्राध्या.छाया बोरकर संमेलन आयोजिकाअ.भा.मा.जी.प. उपस्थित होते.कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, विशेष अतिथी यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले.
या संमेलनाच्या आयोजिका प्राध्या. छाया बोरकर यांच्या शापित श्रुंकला काव्यसंग्रह, भारताची रणरागिनी कादंबरी - उमा गजभिये यांचा गर्भ रेशमी काव्यसंग्रह व्यासपीठावरील उपस्थितांच्या शुभहस्ते प्रकाशित करून लोकार्पण करण्यात आले.
काव्यसंग्रह, कादंबरी प्रकाशनानंतर पुस्तकावरती आपल्या बहारदार शब्दशैलीची अलंकारिक भाषेची आणि मनोरंजक शब्दांची गुंफण करून कवी संमेलनाध्यक्ष प्राध्या. डॉ.धनराज खानोरकर ने. हि.महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळवून हास्यानी श्रोत्यांना लोटपोट केले. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक अनंता सूर, प्राचार्य ईश्वर मोहुर्ले एस.एस.जे. कॉलेज , अर्जुनी माजी प्राचार्य तथा नाट्यसमीक्षक डॉ श्याम मोहरकर यांनी यावेळी भाष्य केले.
या कार्यक्रमातील पुरस्कार वितरण सोहळ्यात कवी अमरदीप लोखंडे यांनी सामाजिक ,शैक्षणिक ,वृक्षारोपण, - संवर्धन , आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेल्या विविध धर्मिय कार्याची दखल अखिल भारतीय मातोश्री जीवन परिवर्तन मराठी साहित्य परिषद च्या आयोजिका संस्थाध्यक्ष प्राध्या.छाया बोरकर व संस्था पदाधिकारी यांनी घेऊन शाल, जीवन गौरव पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन व्यासपीठावरील अतिथींनी सन्मानित केले.
त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करून अभिनंदनचा वर्ष वर्षाव केल्या जात असून पुढील वाटचालीस मित्रपरिवार व आप्त परिवारांनि शुभेच्छा दिल्या.
शेवटच्या सत्रात कवी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धनराज खानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात अमरदीप लोखंडे यांनी शोधतो मायेचा पदर ही कविता सादर करून आजच्या बदललेल्या स्त्रियांच्या वेशभूषेवर लक्ष केंद्रित करून उपस्थित श्रोत्यांचे कवितेच्या एकेक शब्दाकडे लक्ष वेधले.