महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान.कै.मा.सा.कन्नमवार यांची १२५ वी जयंती.
★ बेलदार समाज संघटना,ब्रम्हपुरी चे वतीने येथे मोठ्या उत्साहात साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी १२/०१/२५ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान.कै.मा.सा.कन्नमवार यांची १२५ वी जयंती बेलदार समाज संघटना,ब्रम्हपुरी चे वतीने इव्हिरा रेस्टॉरंट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम मान. मा.सा. कन्नमवारजी यांचे फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जंग्गीटवार सर यांनी केली तर अनिल चिलमवार यांनी मान. कन्नमवारजी यांच्या समाजाप्रती व राज्याप्रती कार्याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजात मागील शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.तसेच महिला बचत गटात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सुध्दा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वंन्देलवार सरांनी केले. या कार्यक्रमाला भुत्तमवारजी,डेकापूरवारजी, कोंडावारजी ,बोड्डावारजी,बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव ईतर सदस्या उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सर्वांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.