लोकविद्यालय गांगलवाडी येथे महाराष्ट्र पोलीस रीजनिंग डे स्थापना दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०६/०१/२५ लोक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,गांगलवाडी ता.ब्रह्मपुरी जिल्हा - चंद्रपूर येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना रीजनिंग डे निमित्य मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीश डोरलीकर, तसेच पोलीस हवालदार अरुण पिसे ट्राफिक पोलीस हवालदार राहुल लाखे बक्कल नंबर १०७५ पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी,यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायदा जादूटोणा प्रतिबंधक कायदा
तसेच भारतामध्ये लागू झालेले नवीन भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरी सुरक्षा संहिता या कायद्याविषयी जनता, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच कोणत्याही अल्पवयीन मुला - मुलीवर होणाऱ्या अत्याचार विषयी तात्काळ पोलीस स्टेशनला व आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती द्यावी,आणि स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री . सुरेश बुरडे सर ,जुमनाके सर, वाढई सर ,रामटेके सर ,खांडेकर सर, राऊत मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.शाळेत मधील ३५० विद्यार्थी - विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.