महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथे स्त्री मुक्ती दिन आणि बालिका दिन.

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथे स्त्री मुक्ती दिन आणि बालिका दिन.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवार ला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथे भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रणी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष कु.कामीडवार मॅडम  तसेच प्रमुख अतिथी म्हणून कु.शिंदे मॅडम ,कु.चांदेवार मॅडम व विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.अलिशा उराडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.ए. सेलोकर सर, ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.गरमडे सर, मा.श्री.डोर्लीकर सर, मा.श्री.नाकाडे सर,तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 


याप्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाषण आणि गीत यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.पवार सर यांनी केले.

         

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !