बालक रमले पुस्तकाच्या घरात " ग्रंथसहवासा " साठी उतरली अख्यी शाळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील कुर्झा वार्डातील कवी,लेखक डॉ.धनराज खानोरकरांनी सुरु केलेले ' पुस्तकाचे घर ' ग्रंथसहवासात नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व संपूर्ण विद्यार्थ्यांनी भेट देऊन कवितावाचन व संभाषणाचा आनंद लुटला.काही विद्यार्थ्यांनी बालसाहित्याची पुस्तके उघडली तर काहींनी कवितावाचन करुन बालकवितांचा आनंद लुटला. कवी प्रदीप देशमुखांचा ' गण गण भोवरा ' व डॉ खानोरकरांचे ' आई लाॅकडाऊन म्हणजे काय? ' यातील बालकविता काहींनी शिस्तीत वाचून दाखविल्या.
याप्रसंगी पुस्तकाच्या घराचे निर्माते डॉ. खानोरकरांनी त्यांच्याशी संवाद साधून, ' बाबा,सुट्टी झाली की लवकर घरी यालं काय?/आईसोबत बागेत मला फिरायला न्याल काय?' ही कविता गाऊन दाखविली. यावेळी युवराज वंजारी सर, हरिदास गोंगले सर,रश्मी बुरडे,तेजल खेत्रे,जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष सुनिल विखार आणि शाळेचे ८५ विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होते.सुनिल विखारांनी ' पुस्तकाच्या घरा'साठी काही पुस्तके भेट दिली.