कुष्ठरोग मुक्तीसाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित. - महेंद्र करांगळे कुष्ठरोग तंत्रज्ञ आर्वी
एस.के.24 तास
वर्धा : महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आर्वी तालुक्यात कुष्ठरोग शोध अभियान दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत आहे, आपले गाव कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी कुष्ठरोगाला आळा घालण्यासाठी शोध अभियानास सहकार्य करावे असे आवाहन श्री.महेंद्र करांगळे यांनी केले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबविल्या जाणार आहे, कुष्ठरोग हा आजार अनुवंशिक नाही हे समजून सांगण्यासाठी आशा वर्कर व स्वयंसेवक यांच्यामार्फत कुष्ठरोगाचा शोध घेतल्या जाणार आहे.
कुष्ठरोग आजार हा मायको बॅक्टेरियम लेप्रि या जंतू पासून होतो, याची लक्षणे न खाजणारा न दुखणारा शरीरावर असलेला बधिरचट्टा,तेलकट गुळगुळीत व लालसर असलेली त्वचा, कानाच्या पाळा जाड होणे, इत्यादी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य उपकेंद्रात जाऊन आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेले आहे.