जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा मोर्चा.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा मोर्चा.

 


एस.के.24 तास






गडचिरोली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरुपी रोजगार द्यावा, विद्यावेतनात वाढ करुन ते नियमित व वेळेवर द्यावे या मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.




गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ पासून २ हजार ३०० मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या २७ आस्थापनांवर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली होती. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये हा कालावधीत संपणार आहे. त्यामुळे आम्हाला जुन्याच आस्थापनेवर कायम करावे.




या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थीनी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील २ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष चरण बन्सोड, सचिव पंकज नैताम आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !