अशोक पवारांच्या " गावखोरी " कादंबरीला वि.सा.संघाचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ०४/०१/२५ सध्या ब्रह्मपुरी येथे वास्तव्यास असलेले लेखक अशोक पवार यांच्या लोकवाङ्मयग्रह ,मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'गावखोरी' कादंबरीला विदर्भ साहित्य संघ,नागपूरचा राज्यस्तरीय पु.य.देशपांडे साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
असून, त्याचे वितरण १४ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते आहे. अशोक पवार हे प्रसिद्ध कादंबरीकार असून त्यांचे 'बिराड' आत्मकथन तर पडझड, इळनमाळ, तसव्या, बेडा, दरकोस दर मुक्काम, भूईभेद, गावखोरी ह्या बहूचर्चित कादंबऱ्या आहेत.
त्यांच्या पुस्तकावर ६ संपादीत पुस्तकं प्रकाशित असून त्यात राज्यातील अनेक मान्यवरांचे लेख आहेत.राज्यातील जवळ जवळ सर्वच विद्यपीठात त्यांची पुस्तकं आभ्यासक्रमात आहेत.त्यांच्या साहित्यावर वेगवेळ्या विद्यापीठातून २२ विद्यार्थ्यांनी एम.फिल.पीएच.डी.केली आहे.
अशोक पवार गेल्या २५ वर्षापासून शोषीत, पीडित आणि भटक्या विमुक्त यांच्या व्यथा वेदना सातत्याने मांडतात. त्यांच्या 'दर कोस दर मुक्काम' कादंबरीवर चित्रपट येतो आहे.त्यांची पुस्तकं वेगवेगळ्या भाषांत भाषांतरीत झालेली आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कवी डॉ.धनराज खनोरकर यांनी 'पुस्तकाचे घरा'त कुर्झा वॉर्ड,ब्रह्मपुरीतर्फे त्यांचा नुकताच सत्कार केला. अशोक पवार यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनचा, महाराष्ट्र फाऊडेशन अमेरिकेचा, नवी दिल्लीचा राष्ट्रीय पातळीवरचा संस्कृती साहित्य राष्ट्रीय पुरस्कारासह ४३ साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत वि.सा.संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल डॉ. शरणकुमर लिंबाळे, डॉ रविंद्र शोभणे, डॉ मच्छिंद्र चोरमारे, डॉ अनंता सूर इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिंनदन केलें आहे.