तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय,आवळगाव येथील विद्यार्थ्यांचे यश.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०२/०१/२५ ब्रम्हपूरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्र विद्यालय ,आवळगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे.ब्रह्मपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचेआयोजन दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२४, शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वी तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शनी नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय येथे भरविण्यात आली.
या या प्रदर्शनीत उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक गट, शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या अनुषंगाने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या वकृत्व स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा ,निबंध स्पर्धा.प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये तालुका स्तरावरून प्रथम क्रमांक कु.समीक्षा प्रभाकर उरकुडे, महाराष्ट्र विद्यालय, आवळगाव तसेच वकृत्व स्पर्धा ,विषय - शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मध्ये शाळेतील कु.जूही सुरेश झरकर तालुका स्तरावरून द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नावलौकिक केले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जूही,सेवानिवृत्ती प्राचार्य डॉ.एस.एन.कोकोडे,विस्तार अधिकारी माणिक खूने,शिक्षण विस्तार अधिकारी मयूर लाडे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची आणि सर्जनशीलतेची प्रशंसा करत परीक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले व प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन त्यांना अभिनंदन दिले.
या यशात शिक्षकांच्या मार्गदर्शनाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. मार्गदर्शक शिक्षिका कु. सुंदरकर मॅडम यांनी प्रकल्प तयार करण्यापासून वकृत्व स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा सादरीकरणापर्यंत विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन आणि योग्य दिशा दिली. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि मेहनत हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे. या यशामुळे त्यांनी विज्ञानात नवकल्पना आणि संशोधन यावर अधिक भर द्यावा.”
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिघोरे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “ विद्यार्थ्यांची मेहनत आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे हे यश मिळाले आहे. हे यश भविष्यातील त्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणादायक ठरेल.”
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक वृंद,मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.स्पर्धेच्या यशाबद्दल महाराष्ट्र विद्यालय आवळगाव शाळेचे नाव तालुक्यात चर्चेचा विषय बनले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या भावी वाटचालीसाठी एक मजबूत पाऊल ठरले आहे.