तहसीलदार आणि बीडीओ सावली यांच्याकडे जितू भाऊ धात्रक आणि मेहा वासीय जनता यांचा मोर्चा आंदोलन.

तहसीलदार आणि बीडीओ सावली यांच्याकडे जितू भाऊ धात्रक आणि मेहा वासीय जनता यांचा मोर्चा आंदोलन.


तालुका प्रतिनिधी,एस.के.24 तास


सावली : मेहा बुजरुक ता सावली येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत. ह्यात ७ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांची गरज आहे. पण मागील २ वर्षापासून फक्त ४ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळेस दोन अलग वर्गाला शिकवल्या जात आहेत. त्यामुळे ह्यात गरीब आणि खेड्यातील विद्यार्थाचा खूप मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. 


त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आणि त्यांचा भविष्यात खूप मोठा फटका ह्या गोष्टीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बसेल. आणि पालक हे गरीब असल्यामुळे ते त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही त्यामुळे त्यांच्या पुन्हा नुकसान होईल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होणार नाही आणि त्यांचे भविष्य हे अंधारमय होईल.


त्यामुळे ह्या विरोधात एक महिन्याच्या आता मेहा बुजरुक येथे ३ शिक्षक तसेच सावली तालुक्यात जिथे जिथे शिक्षक कमी आहेत अश्या सर्व ठिकाणी शिक्षक द्यावेत. अन्यथा न दिल्यास मोठा आंदोलन संपूर्ण सावली तालुक्यातून छेडण्यात येईल. 


ह्या विरोधात जितूभाऊ धात्रक, प्रकाशजी कोलते, नंदाजी पेंदाम, सरपंच रुपेशजी रामटेके, चिमणदासजी निकुरे,देवरावजी गेडाम, वामनजी कोरडे, किशोरजी गंडाटे,कांतेशजी बानबले, मदनजी निकुरे, सुभाषजी ढोलणे तसेच इतर महिला उपस्थित होत्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !