महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कोसंबी येथे संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी कोसंबी तालुका ब्रह्मपुरी येथे कार्यक्रमाचे उद्घाटन तथा पुतळ्यांच्या अनावरन मा.ऍड. राजेंद्र जी महाडोळे यांच्या शुभहस्ते , कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य मा.यशवंत कोकोडे सर व प्रमुख उपस्थिती प्रा. नामदेवराव जेंगठे, सौ वंदनाताई शेंडे श्री.सुधाकर भाऊ महाडोळे, सुषमाताई मोहूरले,श्री.अरुण भाऊ शेंडे, श्री.रामकृष्णजी भोयर,श्री.नंदू भाऊ बारस्कर सौ.ममता ताई महाडोळे
या कार्यक्रमात उद्घाटन पर ऍड.राजेंद्र जी महाडोळे यांनी विचार व्यक्त करताना महामानवांचे "पुतळे बसविणे म्हणजे इतिहासाची निर्मिती करणे व हा आदर्श आजूबाजूच्या परिसरामध्ये समाजाला देऊन विचारांचा प्रचार व प्रसारा चे कार्य होय." कोसंबी येथील गावकऱ्यांनी पुतळाच्या अनावरण पूर्वी शोभायात्रा काढून अभिवादन केले.समस्त गावकऱ्यांनी आताच परिश्रम घेतले