दिव्यांगाना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक,15/01/2025 रोजी पुलगाव आगार मध्ये आगार व्यवस्थापक सुरेश बोबडे. बस स्थानक प्रमुख वाय. एन खंडार. टी आय विलास नागोसे. यांच्या उपस्थित सर्व पुलगाव वासी दिव्यांग पुलगाव बस स्थानक मध्ये उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापक सुरज बोबडे यांचे स्वागत प्रहार चे पुलगाव शहर अध्यक्ष संतोष नंदेश्वर यांनी केले.
बस स्थानक प्रमुख वाय एन खंडार त्यांचे स्वागत अवनी इंटरप्राईजेस संचालक विपुल पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे टी आय विलास नागोसे प्रमुख मार्गदर्शक बिट्टू रावेकर यांनी केले.पुलगाव शहर आगर मध्ये सर्व दिव्यांग ख़ुशी मध्ये जमले होते. यावेळी पुलगाव बस स्थानकात फलक लावून हार टाकून कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमाला उपस्थित बिट्टू रावे कर प्रमुख मार्गदर्शक. प्रहार पुलगाव शहराध्यक्ष संतोष नंदेश्वर. अवनी इंटरप्राईजेस संचालक विपुल पाटील. शंकर लड्डे. गजानन थोरात. पुंडलिक तायडे. तनवीर खान. दादाराव वाघमारे. कवडू भोयर. खुशाल बैस. व आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानले. दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांग ना आरक्षण असणे निश्चित केलेले आहे. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.
त्यावेळी बस मध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवासासाठी उपलब्ध होईल. तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बस मध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल.
याचबरोबर दिव्यांगणी प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून चढ-उतार करताना त्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अव गत करून बसमधून उतरण्याची चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी. असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. अभिजीत भोसले जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.