क्रांती सूर्य माळी समाज संघटन पोटेगाव च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
एस.के.24 तास
गडचिरोली : क्रांती सुर्य माळी समाज संघटन पोटेगाव यांच्या वतीने सावित्रीबई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना सुरपाम सरपंचा पोटेगाव होत्या.प्रमुख पाहुणे गंगाधर मडावी सामाजिक कार्यकर्ते,प्राचार्य देव्हारे विदर्भ विद्यालय पोटेगाव,मुनघाटे सर,कापेकर साहेब, शिवाजी नरोटे,किशोर मुनरतीवार,विनोद मडावी , नरेंद्र मोहुर्ले,धनराज दामले,डॉ.कुमरे मॅडम , फिरोज कुरेशी,खेवले साहेब,वासनिक सर होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना सुरपाम सरपंचा पोटेगाव म्हणाल्या की , सावित्रीबाई फुलेनी स्त्रि शिक्षणासाठी शेन माती व दगडाचा मार खाऊन अपमान सहन केला.त्यामुळे आज महिला वेगवेगळ्या पदावर जाऊन सन्मानाने जगत आहेत. या प्रसगी प्रमुख मार्गदर्शक गंगाधर मडावी म्हणाले की , राष्ट्रपिता जोतिराव फुलेना शिक्षणाची तळमळ होती.
याचा परिणाम सावित्रीबाई फुलेच्या मनावर झाला . या प्रसंगी प्राचार्य देव्हारे म्हणाले की ,ज्या काळात सती प्रथा, बालविवाह, अशा कुप्रथा होत्या त्या काळात सावित्री बाईनी शिक्षणाचा पाया रोवला.यावेळी शिवाजी नरोटे,किशोर मुनरतीवार,विनोद मडावी,धनराज दामले,नरेंद्र मोहुर्ले,योगिता मोहुर्ले यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर मुंजमकार यांनी केले.प्रास्ताविक मोहुर्ले मॅडम यांनी केले तर आभार जगदिश मोहुर्ले यांनी मानले.या कार्यक्रमाला सयाजी वाडगुरे,नरेश मोहुर्ले,गुडडू वाडगुरे,योगेश वाडगुरे,पुरुषोतम मोहुर्ले,वामन वसाके,कालीदास आलाम,अशोक मडावी, देवाजी बांबोळे,मंसाराम मोहुर्ले, लक्ष्मण मोहुर्ले आणि समस्त माळी समाज बांधव उपस्थित होते.