डास नियंत्रणासाठी जीवशास्त्रीय उपायोजना गप्पी मासे,गप्पी मासे पाळा कीटकजन्य आजार टाळा. - देवेंद्र थेटे
एस.के.24 तास
वर्धा : डास नियंत्रणा करता गप्पी मासे जीवशास्त्रीय उपायोजना असून गप्पी मासे हे डासाच्या अळीवरच जिवंत राहतात,नराची लांबी दोन ते तीन सेंटीमीटर असून तर मादीची लांबी चार ते सहा सेंटीमीटर असते,गप्पी मासा हा डासाच्या आळ्या खातात,अळ्यावरच जिवंत राहतात,गप्पी माशाचे मादी हे 30 ते 50 पिल्लांना जन्म देते.
गप्पी मासे मुळे डास नियंत्रणात राहून पर्यावरणावर दूषित परिणाम होत नाही,आज दिनांक १८/१/ २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी उपकेंद्रस्तरावर धडक गप्पी मासे पकडणे व सोडणे मोहीम,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विखे मॅडम
तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.वर्मा सर,रोहना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रेया डंभारे,डॉ.ज्योती सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली,त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथील आरोग्य कर्मचारी, विलास शिंगणे, जगदीश कचोरे, बाळकृष्ण पोहरकर, देवेंद्र थेटे, अजय वैद्य, यांनी उपकेंद्र स्तरावर कायमस्वरूपी व निरुपयोगी विहिरीमध्ये, गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबवली.