नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था,ब्रम्हपुरी ची नूतन कार्यकारीणी गठीत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०७/०१/२५ येथिल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, व्यवस्थापन ब्रम्हपुरीची निवडणूक दि.०२जानेवारी २०२५ ला निवडाणूक अधिकारी, अँड.विजय ढोरे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यामध्ये पुढील पांच वर्षाकरीता नूतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे गठीत करण्यात आली.
यामध्ये नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून मा.श्रीमती स्नेहलताबाई भैया,संस्थेचे उपाध्यक्ष, अँड.प्रकाशजी भैया,सचिव, मा.अशोकजी भैया,सहसचिव मा. अँड. भास्करराव उराडे,कोषाध्यक्ष मा.श्री.रामभाऊ क-हाडे, सदस्य,मा.प्रा.सुभाष बजाज, मा.श्री.अतुलजी भैया,मा.प्रा. गिरीधारीलाल केला,मा. प्रशांतजी भैया,मा.मोहनलाल भैया,मा.गौरवजी भैया,मा. गोपाल भैया,मा.सौ.आशिता भैया यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.सदर निवडणूका १९४१ पासून बिनविरोध होत आलेल्या आहेत.
या प्रसंगी नूतन संस्थेची कार्यकारीणी गठीत झाल्याचे औचित्य साधून नेवजाबाई भैया हितकारिणी संस्थेमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळयामध्ये वरील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला गेला.
या कार्यक्रमाला ने.हि. महाविद्यालाचे प्राचार्य डॉ.डी. एच.गहाणे,कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मेजर नरड,पर्यवेक्षक प्रा.ए. एम.भोयर,एन.सी.सी. ऑफीसर ले.परकरवार,एन. एच.मुलांच्या शाळेचे मुख्याख्यापक श्री.नाईक, एन.एच.कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बनपुरकर मॅडम, एल.एम.बी स्कुलचे प्राचार्य श्री.कुरेशी, उपप्राचार्य सौ.राठी, सुपरवाइझर सौ.झोडे,एन.एच.स्कुल नेवगाव पांडवचे श्री.चुन्हे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारीवृंद मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार उपप्राचार्य डॉ.एस.एम.शेकोकर यांनी केले.