निबाळा येथे स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत मौजा निबाळा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच तथा महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच नंदकिशोर वाढई यांनी येथे अनेक विकासकामे ग्रामविकासाच्या विविध विभागांमधुन खेचून आणली असून येथे सामाजिक
पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या गाव सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. याच हेतूने ग्रामपंचायत कळमना अंतर्गत मौजा निबाळा येथे जिल्हा विशेष निधी अंतर्गत वर्ग खोली दुरुस्ती व पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष, खनिज कल्याण निधी अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १५ लक्ष व
१५ वा वित्त आयोग मार्फत नाली बांधकामासाठी १ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी श्री. वाढई यांनी कळमना,निंबाळा येथे विविध विकासकामांची पुर्तता करुन येथे स्वच्छता,आरोग्य, वृक्षारोपण, पर्यावरण, शैक्षणिक व सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, प्रियंका गेडाम, निंबाळा चे पोलीस पाटील गोपाल पाल, ग्रामसेवक सिताराम मरापे, मुख्याध्यापक गोवारदिपे, अंगणवाडी सेविका पेंदोर मॅडम, जेष्ठ नागरिक महादेव मेश्राम, विठ्ठलराव पाल, प्रशांत पेंदोर, विठ्ठल परचाके, दौलत मोडघरे, गणेश मेश्राम, मनिषाताई मोडघरे , ज्योती मोडघरे, ज्योत्स्ना पिंपळकर
नामदेव पाल, नामदेव देवाळकर, मुरलीधर पेंदोर, खेमदेव देवाळकर, विलास तेलंग, बंडु मोहारे, नेहरू शेलकी, देवानंद मोहारे, राजेश देवाळकर, शंकर मेश्राम, मिननाथ शेरकी, शंकर कोगरे, मनोज गेडाम, जगदिश पिंपळशेंडे, निलकंठ घाटे, धोंडु झाडे, गोपाल मोडघरे, विकास सिडाम, किशोर भोपये, भारत टेकाम यासह शाळेचे विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.