प्रामाणिक प्रयत्न केले तर विजय निश्चित ; पारितोषिक वितरण समारंभ : प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२२/०१/२५ " आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यायचे आहे.रडत न बसता जीवनात आनंद शोधा.आजच्या जगात धन आहे पण मान नाही.आपण लहान गोष्टीतही सुख शोधायला शिकले पाहिजे.माणूस परिस्थितीनुसार बदलतो. प्रामाणिक प्रयत्न केले तर आपला विजय निश्चित असतो." असे बहुमोल मार्गदर्शन श्री गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा येथील प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटेंनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात वार्षिकोत्सव वितरण समारंभात बोलत होते.
विचारपिठावर अध्यक्षस्थानी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया होते तर प्रमुख उपस्थितीत म्हणून संस्थेचे सदस्य गौरव अशोक भैया, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, प्राचार्य डॉ एम एस वरभे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, प्रा मेजर विनोद नरड,प्रभारी डॉ वर्षा चंदनशिवे,डॉ सुनिल चौधरी, डॉ हर्षा कानफाडे, विद्यार्थी प्रतिनिधी पकंज भोयर, समीक्षा पंडीत,सलोनी भांडारकर,सुषमा ठुसे उपस्थित होते.यावेळी, पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल पण स्पर्धेत भाग घ्या.उत्तम नियोजन जीवनाला सुकर बनविते असे विचार गौरव भैयांनी मांडले.
तर अध्यक्ष अँड प्रकाश भैयांनी ज्यांनी खेळात, स्पर्धेत भाग घेतले त्यांचे अभिनंदन करुन जीवनाला आकार विद्यार्थी दशेत मिळत असते,असे विचार व्यक्त केले.पाहुण्यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांनी पारितोषिक वितरण केले गेले तर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर,डॉ युवराज मेश्राम,रोशन डांगे यांचा विशेष गौरव केला गेला.या कार्यक्रमाचे संचालन डॉ.ज्योती दुपारे ,प्रा अजय खोब्रागडे व प्रा शिरीष खाननी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डी एच गहाणे, संचालन प्रा अभिजित परकरावार तर आभार प्रभारी डॉ वर्षा चंदनशिवेंनी केले.यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,डॉ तात्याजी गेडाम,डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ रतन मेश्राम,डॉ किशोर नाकतोडे, डॉ युवराज मेश्राम,डॉ अरविंद मुंगोले,प्रा बालाजी दमकोंडवार,डॉ अतुल येरपुडे,डॉ पद्माकर वानखडे, डॉ निलिमा रंगारी,डॉ दर्शना उराडे, प्रा आनंद भोयर,प्रा दलेश परशुरामकर,प्रा रुपेश वाकोडीकर व इतर सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले