कौतुकाचा विषय,प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथे हळदी कुंकू कार्यक्रमातून दिला सामाजिक संदेश.
एस.के.24 तास
वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथील आरोग्यसेविका या महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमातून सामाजिक संदेश देत एक अनोख्या पद्धतीने संक्रांत साजरी केली, मकर संक्रांति म्हटल की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय येतो, संक्रांति निमित्त महिला आपल्या घरी कार्यक्रम ठेवत वान म्हणून भेटवस्तू देतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथील महिलांनी पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून सर्व महिला एकत्र येत सार्वजनिक हळदी, कुंकू कार्यक्रमाची सुरुवात केली,आणि विशेष म्हणजे किंवा हळदीकुंकू कार्यक्रम न ठेवता, सदर कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक संदेशाची वानाच्या रूपाने देवान घेवाण म्हणून केली, त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहना येथील सर्व अधिकारी व सर्व आरोग्य सेविका कार्यक्रमाला उपस्थित होत्या