दुचाकीने आगडी येथून चिरोलीकडे जाताना रानडुकराला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; युवती गंभीर.
एस.के.24 तास
मुल : दुचाकीने आगडी येथून चिरोलीकडे जाताना रानडुकराला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर युवती गंभीर झाली. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री 8 : 00.वा.दरम्यान जानाळा आश्रमशाळेजवळील वळणावर घडली.
महेंद्र डंबाजी कोडापे वय,34 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.राणी रमेश मडावी वय,21 वर्ष,दोघेही आगडी हिला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
आगडी येथील महेंद्र कोडापे आणि राणी मडावी हे दोघे MH.33 J 1750 क्रमांकाच्या दुचाकीने चिरोली येथे मावशीकडे जात होते.दरम्यान, अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराला दुचाकी धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. महेंद्र कोडापे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.